Rajya Natya Spardha Result

Rajya Balnatya Spardha Result : जळगाव केंद्रातून ‘जय हो फॅन्टसी’ प्रथम

हॅपनिंग महाराष्ट्र

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 20 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल (Rajya Balnatya Spardha Result) बुधवार (दि.24) रोजी जाहीर झाला. यात जळगाव केंद्रातून के.सी.ई. संस्थेचे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या ‘जय हो फॅन्टसी’ या नाटकाला प्रथम तर नाट्यरंग बहुउद्देशीय संस्थेच्या ‘म्हावरा घावलाय गो’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर (Result Declare) झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केली. या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. (rajya-balnatya-spardha-result-:-‘jai-ho-fantasy’-first-from-jalgaon-center)

Rajya Balnatya Spardha Result
Rajya Balnatya Spardha Result

स्पर्धेच्या (Rajya Balnatya Spardha) प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे :-
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक : अमोल ठाकूर (नाटक – म्हावरा घावलाय गो), द्वितीय पारितोषिक : वैभव मावळे (नाटक – जय हो फॅन्टसी),
प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक : अम्मार मोकाशी (नाटक – म्हावरा घावलाय गो), द्वितीय पारितोषिक : लोकेश मोरे (नाटक – जय हो फॅन्टसी),
नेपथ्य : प्रथम पारितोषिक : दिनेश माळी (नाटक – जय हो फॅन्टसी), द्वितीय पारितोषिक : महेश कोळी (नाटक – क ला काना का),
रंगभूषा : प्रथम पारितोषिक : ज्योती पाटील (नाटक – जय हो फॅन्टसी), द्वितीय पारितोषिक : ज्ञानेश्वर सोनवणे (नाटक – मारुतीची जत्रा)
उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक : यश बारी (नाटक – मारुतीची जत्रा) व शर्वा जोशी (नाटक – म्हावरा घावलाय गो),
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : निधी जाधव (नाटक – म्याडम), लायना निमगावकर (नाटक – गांधी व्हायचं आम्हाला), पूर्वा जाधव (नाटक – क ला काना का), गायत्री भोसले (नाटक – विळखा), उर्मिला पाटील (नाटक – मरी गई), गगनदीप पवार (नाटक – राक्षस), अविनाश कुलकर्णी (नाटक – जय हो फॅन्टसी), मनिष जाधव (नाटक- विद्या विनयेन शोभते), समर्थ साळुंके (नाटक- कॉफी बहाद्दर), अभिनव पाटील (नाटक- सुपर पावर).

27 नाट्यप्रयोगांचे सादरीकरण
शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे 15 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 27 नाट्यप्रयोग (Rajya Balnatya Spardha) सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विशाखा शिरवाडकर, गिरीश भूतकर आणि सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले.

कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी : मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे तर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister of Cultural Affairs Sudhir Mungantiwar ) यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या बालनाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

1 thought on “Rajya Balnatya Spardha Result : जळगाव केंद्रातून ‘जय हो फॅन्टसी’ प्रथम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत