Pawan Khambayat

भाजपा सांस्कृतिक सेलच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन खंबायत यांची नियुक्ती

यश-निवड राजकारण

जळगाव : भारतीय जनता पार्टी (BJP Jalgaon) सांस्कृतिक सेलच्या (BJP Cultural Cell) जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन अशोक खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे व आ. राजूमामा भोळे यांच्याहस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pawan Khambayat appointed as Jalgaon District Coordinator of BJP Cultural Cell)

पत्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आशिर्वादाने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात आपली भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक सेलच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.

पवन खंबायत यांच्या निवडीबद्दल राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, सर्वश्री आ. राजूमामा भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे आदींनी अभिनंदन केले आहे.

1 thought on “भाजपा सांस्कृतिक सेलच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन खंबायत यांची नियुक्ती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत