प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सामाजिक

मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रसन्न सुरेश देशमुख यांना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवकाई प्रतिष्ठान व मिताली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.२१) रोजी रोटरी भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी वायुसेना अधिकारी प्रकाश दाते, सिने कलावंत डॉ. सतीश कुलकर्णी, केसावर फुगे फेम अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत, सुनील दाभाडे, विनोद महाजन, राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ह.भ.प. कुमारी माईसाहेब जळगावकर आदी उपस्थितांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रा. डॉ.प्रसन्न देशमुख पर्यावरण क्षेत्रात वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जनजागृती, पर्यावरण रॅलीचे आयोजन, व्याख्यान व मार्गदर्शन ई प्रबोधनात्मक कार्यक्रम करत असतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब दादा शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत