Wardha Crime News

Wardha Crime News : अंधश्रद्धेतून 12 वर्षीय बालकांचा नरबळी देण्याचा प्रयत्न

गुन्हे

वर्ध्यातील नालवाडी परिसरातील घटना; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : विहिरीला शेंदूर लावायचे सांगून शेंदूर लावण्यासाठी खाली वाकलेल्या 12 वर्षीय मुलाला महिलेने विहिरीत ढकलल्याची (Crime News) धक्कादायक घटना वर्ध्यातील (Wardha) नालवाडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेतून (superstition) या बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेवर वर्धा पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (An attempt to sacrifice 12-year-old children out of superstition)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा शिक्षणासाठी वर्ध्यातील (Wardha) नालवाडी परिसरात आपल्या आजी-आजोबांकडे वास्तव्यास आहे. तो बालक परिसरात पतंग उडवत असतांना नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा वरके नामक महिलेने त्याला काहीतरी काम आहे, असा बहाणा करीत सोबत नेले. विहिरीजवळ पोहचल्यावर त्याला विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. पीडित बालक विहिरीला शेंदूर लावण्यासाठी वाकल्यानांतर शारदा हिने त्याला लगेच विहिरीत ढकलले. (Crime News)

अन प्रकार झाला उघड…
शारदा वरके हिने बालकाला विहिरीत ढकलल्यानंतर तेथून पळ काढला. तर मुलाने विहिरीतील दोरीच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर येत स्वतःचे प्राण वाचवीले. विहिरीतून बाहेर आल्यानंतर भेदरलेल्या बालकाने घरी धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून शारदा वरके हिच्यावर अपराध क्रमांक 363, 307, भादवी सहकलम 3, महाराष्ट्र नरबळी तसेच इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून (Wardha Police) तपासाला सुरुवात करण्यात आली असून शारदा वरके हिचा शोध घेतला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत