Crime News

१ कोटी रुपयांचे नेटवर्क कार्ड चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुन्हे

पवई पोलीस स्टेशनच्या पथकाची कामगिरी; माहीम, दिल्ली येथून १ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मुंबई :- पवई येथील नेक्ट्रा कंपनीच्या डेटा सेंटरमधील १ कोटी रुपये किमतीचे ४ नेटवर्क कार्ड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी तिघं चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले असून त्यांनी माहीम आणि दिल्ली येथे विकलेले कार्डही हस्तगत करण्यात आले आहेत.

ऐरटेल कंपनीशी संलग्न असलेल्या नेक्ट्रा कंपनीचे चांदीवली येथील लाइट हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर डेटा सेंटर असून याठिकाणी वायरिंगचे काम सुरु असतांना या कामासाठी आलेल्या काही कामगारांनी १ कोटी ३ हजार रुपये किमतीचे चार साईना मेट्रो कोअर / डब्लू एल ५ ई (Ciena Metro Core/WL5e) चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वालसन सर्व्हिस सेक्युरिटी कंपनीचे व्यवस्थापक दीपक किशनलाल सरावग (वय – २९, रा. घणसोली, नवी मुंबई) यांच्या फिर्यादीवरून पवई पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि कलम ३८०, ४११, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघांना मानखुर्द तर एकास माहीम येथून घेतले ताब्यात
गुन्ह्याचा तपास सुरु असतांना कंपनीत कामासाठी आलेल्या तिघांनी हे कार्ड चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पवई पोलीस स्टेशनच्या पथकाने अजय चंद्रभान सरोज (वय – २२) व दिनेश पवारू सरोज (वय – ३६), (दोघेही रा. मानखुर्द, मुंबई) यांना राहत्या घरून ताब्यात घेतले. तर मो. तबरेज मो. आरिफ शेख (वय – २८, रा. माहीम, मुंबई) यास माहीम येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांना खाकी दाखविल्यानंतर त्यांनी चोरी केलेले कार्ड माहीम व दिल्ली येथे विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने दिल्ली येथे जावून गझिपूर, मयूर विहार, दिल्ली येथून दानिश मलिक यास ताब्यात घेतले असून दोघांकडून गुन्ह्यातील १ कोटी ३ हजार रुपये किमतीचे ४ नेटवर्क कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.

या पथकाने केली कामगिरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, श्री. नागरे (साकीनाका), पोलीस हवालदार टिळेकर, श्री. येडगे, पोलीस नाईक झेंडे, पोलीस शिपाई संदीप सुरवाडे, श्री. शेट्टी, श्री. ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. पथकाला पोलीस नाईक पिसाळ यांनी तांत्रिक मदत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत