Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

भारत गुन्हे

गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली. या अपघातात (Accident) १२ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून १० मृतदेह ताब्यात

गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बालिजान भागात हा अपघात झाला. या विषयी बोलतांना गोलाघाटचे पोलीस अधीक्षक राजेन सिंह यांनी सांगितले की, आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बलिजान परिसरात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. घटनास्थळावरून १० मृतदेह ताब्यात घेण्यात आले. ते मृतदेह डेरगाव सीएचसीमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर २७ जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते.

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील (Accident) मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. आमचा तपास सुरू असून आम्ही कायद्यानुसार कारवाई करू, असेही गोलाघाटचे पोलीस अधीक्षक राजेन सिंह यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत