दोन आयशरमधून ८३ लाखांचा गुटखा जप्त

गुन्हे

गुटखासह पाच जण ताब्यात; फैजपूर पोलिसांची कामगिरी

फैजपूर : बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे येणाऱ्या दोन आयशर वाहनावर बुधवारी फैजपूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८३ लाखांच्या (Gutkha) गुटख्यासह १ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची (Gutkha) तस्करी होत असल्याची गुप्त माहिती फैजपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून फैजपूरचे एपीआय निलेश वाघ यांनी पथकासह बुधवार (दि.१०) रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ सापळा रचून संशयित आयशर वाहनांची तपासणी केली.

सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

फैजपूर पोलिसांनी आयशर क्रमांक एम.एच.१९ सी.वाय. ९३६४ व एम.एच.१९ सी.एक्स.०२८२ या दोन वाहनांची तपासणी केली. यावेळी या वाहनांमध्ये गुटखा (Gutkha) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर पोलिसांनी ही दोन्ही वाहने जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी ८३ लाख ६ हजार रुपये किमतीच्या गुटखासह ३४ लाख रुपये किंमतीची दोन वाहने असा तब्बल १ कोटी १७ लाख ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चालकासह चौघे ताब्यात

याप्रकरणी पोलिसांकडून ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी ( वय-३३, रा. कोदगाव, ता. चाळीसगाव, ह.मु.शास्त्रीनगर, चाळीसगाव), सुनील पाटील (वय-३१, रा. रामनगर, एमआयडीसी, जळगाव), राकेश अशोक सोनार (वय-२९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), जयेश सुभाष चांदेलकर (वय-३३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यासह गाडी चालक मंगेश पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत