जळगावचा हर्ष अग्रवाल सीए परीक्षेत भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

यश-निवड

जळगाव : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर २०२३ या महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जळगावातील हर्ष श्याम अग्रवाल हा भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

हर्ष अग्रवाल हा जळगावातील रहिवाशी असून नवीपेठेतील श्याम पेपर्स या प्रसिद्ध फर्मचे संचालक श्याम अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या (Chartered Accountant) परीक्षेला बसतात. देशातील खडतर परीक्षेमध्ये याचा समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. पण हर्ष याने पहिल्याच प्रयत्नांत जिद्दीनं मात करत ही परीक्षा पास केली आहे. त्याच्या वडिलांचा जळगावात व्यवसाय असून आई गृहिणी आहेत. तसेच मोठा भाऊ हा पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे.

हर्षला त्याचे आई-वडील, भाऊ, मित्र आणी शिक्षकांची खंबीर साथ मिळाल्यामुळे हे यासह प्राप्त झाल्याचे हर्ष सांगतो. हर्षने सीए परीक्षेकरिता स्वत: साठी एक विशिष्ट तयारी केली होती. त्याच तयारीच्या जोरावर हर्षने हे यश संपादन केलं असल्याचं तो सांगतो. हर्षच्या या यशाबद्दल समाजबांधवांसह सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत