जामनेर : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील १० क्रीडा शिक्षक, खेळाडू उत्तीर्ण झाले आहेत.
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे दि.४ मे २०२३ रोजी लाडकारंजा (जि. वशिम) येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल बुधवार (दि.१०) रोजी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन महासचिव डॉ. हनुमंत लुगे यांनी जाहीर केला.
या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख गिरीश चंद्रराव पाटील (अ श्रेणी), उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार (ब श्रेणी), राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू तथा माजी विद्यार्थी सुष्मित गिरीश पाटील (ब श्रेणी), वरणगाव येथील प्रा. आशिषकुमार चौधरी, चाळीसगाव येथील राहुल साळुंखे, धरणगाव येथील सचिन सूर्यवंशी, योगेश सोनवणे, गिरीश महाजन, नितीन पाटील व जळगाव येथील विशाल सोनवणे आदींनी यश संपादन केले.
उत्तीर्ण पंचाचे महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव व सचिव योगेश सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.