पाचोरावरून येणाऱ्या बसेसना शिरसोली येथे थांबा द्या!

सामाजिक

शिरसोली ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची मागणी; आगार व्यवस्थापक यांना दिले निवेदन

अशोक पाटील | वार्ताहर

शिरसोली : पुढील महिन्यापासून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पाचोरा, चाळीसगावकडून येणाऱ्या सर्व बसेसना शिरसोली (प्र.बो व प्र.न) येथे थांबा द्यावा, अशी मागणी शिरसोली ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जळगाव आगार व्यवस्थापक मनोज तिवारी यांना शनिवार (दि.६) रोजी हे निवेदन देण्यात आले. निवेदनात, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेच्या वेळेनुसार गावात बस थांबावी. सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत जळगांवला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच पुढील महिन्यापासून इयत्ता १० वी आणि १२ वीची बोर्ड परीक्षा सुरु होणार आहे. त्यामूळे पाचोरा, चाळीसगावकडून येणाऱ्या बसेसना शिरसोली (प्र.बो व प्र.न) येथे थांबा देण्यात यावा. अनेकदा बस थांबत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होते, असे नमूद करण्यात आले आहे.

…तर चालक, वाहकावर कारवाई

यावेळी बोलतांना आगार व्यवस्थापक तिवारी यांनी, सध्या शैक्षणिक सहली सुरू असल्याने जळगाव आगाराच्या १४० पैकी ३६ बसेस सहलीसाठी गेल्या आहेत. त्यामुळे बसेचची समस्या जाणवत असल्याचे सांगितले. पाचोराकडून येणाऱ्या ज्या बस शिरसोली येथे थांबणार नाहीत अशा बसेसचा नंबर द्या, त्या बसच्या चालक आणि वाहकावर मी स्वत: कारवाई करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  

यांची होती उपस्थिती 

निवेदन देतेवेळी नानासाहेब आर.बी. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप ठोसर, शिक्षक सचिन हटकर यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत