Dhule GMC Recruitment : धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३७ जागांसाठी भरती

Blog

मुंबई : शासकीय नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धुळे येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Recruitment) १३७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून बुधवार (दि.३) पासून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

प्रयोगशाळा परिचर पदाच्या ७, शिपाई पदाच्या ९, पहारेकरी पदाच्या ५, शवविच्छेदन परिचर पदाच्या ३, प्राणी गृह परिचर पदाच्या १, दप्तरी पदाच्या १, परिचर पदाच्या २, सफाईगार पदाच्या २६, शिंपी पदाच्या १, दंत परिचर पदाच्या १, उदवाहन चालक पदाच्या १, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक पदाच्या १, कक्षसेवक पदाच्या ३१, रुग्णपट वाहक पदाच्या २, न्हावी पदाच्या ३, धोबी पदाच्या ४, चौकीदार पदाच्या ३, प्रयोगशाळा परिचर पदाच्या १, माळी पदाच्या १, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया पदाच्या ९, बाहयरुग्ण विभाग सेवक पदाच्या ५, सुरक्षारक्षक/पहारेकरी पदाच्या ३, प्रमुख स्वयंपाकी पदाच्या ४, सहायक स्वयंपाकी पदाच्या २, स्वयंपाकी सेवक पदाच्या ५ आणि क्षकिरण सेवक पदाच्या ३ अशा एकूण १३७ जागांसाठी ही भरती (Recruitment) होणार आहे.

७ वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी

सफाईगार पदासाठी ७ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत तर न्हावी, माळी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी , आणि स्वयंपाकी सेवक पदासाठी १० वी उत्तीर्ण आणि सबंधित विषयात आयटीआय/प्रमाणपत्र/अनुभव प्रमाणपत्र धारक अर्ज करू शकतात. उर्वरित पदांची शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहावी.

आजच करा अर्ज

बुधवार दि. ४ जानेवारीपासून आँनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षापर्यंत असून मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सूट देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी १००० तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा

https://www.sbhgmcdhule.org/

ऑनलाइन अर्जासाठी क्लिक करा

https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत