Eid Mubarak

देशात सर्वत्र शांतता नांदू दे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागू दे!

मुस्लिम समाज बांधवांनी केली अल्लाहकडे प्रार्थना; रवंजे येथे ईद मोठ्या उत्साहात साजरी रडार लाईव्ह न्यूज । रवंजे बु. वार्ताहर देशात सर्वत्र शांतता नांदू दे तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागू दे, अशी प्रार्थना मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली. सोमवार, दि. १७ रोजी रवंजे (ता. एरंडोल) येथे मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. […]

Continue Reading

E-Kuber System : पेंशन धारकांनो ही बातमी वाचली का? आता ‘या’ बँकेतून थेट खात्यात जमा होणार पेंशन

जळगाव : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेंशन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून (Reserve Bank of India) थेट पेंशन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.  पेंशन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी (IFSC) […]

Continue Reading

एम. टी.एस. परीक्षेत खडके विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; गुणवंतांचा सत्कार

जळगाव : राज्यस्तरीय एम. टी.एस. स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. भुसावळ येथील के. नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्था व के‌. एन.सी.टी.आय.एम.टी.एस. तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्वा. सै. ज. सु. […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : बाल कलाकारांनी नाटकातून घेतला विद्यार्थी, बालकांच्या प्रश्नांचा ठाव

जळगाव : सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य (Rajya Balnatya Spardha) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ७ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. एका पेक्षा एक सरस विषय घेवून सादर झालेल्या नाटकांनी काही महत्त्वाच्या सामाजिक विषयात हात घालत रसिकांना खिळवून ठेवले. राज्य बालनाट्य स्पर्धेच्या (Rajya Balnatya Spardha) दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रांजल पंडित […]

Continue Reading

Dhule GMC Recruitment : धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३७ जागांसाठी भरती

मुंबई : शासकीय नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धुळे येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Recruitment) १३७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून बुधवार (दि.३) पासून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रयोगशाळा परिचर पदाच्या ७, शिपाई पदाच्या ९, पहारेकरी पदाच्या ५, शवविच्छेदन परिचर पदाच्या ३, प्राणी गृह परिचर पदाच्या […]

Continue Reading
valu mafiya

वाळू माफियांना जोरदार दणका; शंभरपेक्षा जास्त ट्रॅक्टर, डंपर जप्त

गिरणा नदीपात्रासह बांभोरी गावात महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई जळगाव :- जिल्ह्यात हैदोस घातलेल्या वाळू माफियांना शनिवार दि.१९ रोजी जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला. महसूलच्या विभागीय पथकासह जळगाव महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने गिरणा नदी पात्रासह बांभोरी गावात कारवाई करत १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर व डंपर जप्त केल्याचे समजते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या […]

Continue Reading
Chatrapati Shivaji Nagar

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना चिखलातून काढावी लागतेय वाट

रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करून देण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. या चिखलामुळे अनेकांना दुखापत देखील झाली असून रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर हा भाग शहरातील प्रमुख भागांपैकी एक असून […]

Continue Reading