Eid Mubarak

देशात सर्वत्र शांतता नांदू दे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागू दे!

Blog

मुस्लिम समाज बांधवांनी केली अल्लाहकडे प्रार्थना; रवंजे येथे ईद मोठ्या उत्साहात साजरी

रडार लाईव्ह न्यूज । रवंजे बु. वार्ताहर

देशात सर्वत्र शांतता नांदू दे तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागू दे, अशी प्रार्थना मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली. सोमवार, दि. १७ रोजी रवंजे (ता. एरंडोल) येथे मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ईदनिमित्त सामूहिक नमाज अदा करू अल्लाहकडे ही प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रवंजे (ता. एरंडोल) येथे बकरी ईदनिमित्त जामा मस्जिद येथे नमाज पठण करण्यात आली. जामा मस्जिदचे मौलवी समिर पटेल यांनी नमाज पठण केली. यावेळी सर्व मानवजातीला यशस्वी होऊ दे, शेती व पिण्यासाठी चांगला पाऊस पडू दे, विश्वामध्ये शांती नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यात मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ईदनिमित्त सकाळपासूनच समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. नमाज पठणसाठी आलेल्या सर्व आबालवृद्धांनी नवीन वस्त्र परिधान करून नमाज पठण केली. त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच घरोघरी जाऊन हिंदू-मुस्लिम बांधवांच्या भेटी घेत शुभेच्छा दिल्या.

ईदनिमित्त लोकनियुक्त सरपंच नामदेव माळी, उपसरपंच इफ्तेखार तांबोळी, उपसरपंच डाॅ. धर्मराज कोळी, लियाकत बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य मुस्तकीम बागवान, ग्रामपंचायत सदस्य संदीप तायडे, सुनील धनगर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष आबीद बागवान, फारुख खाटीक, अय्युब मिस्तरी, अस्लम शेख, रवंजे बु.चे पोलीस पाटील शरयू चौधरी, रवंजे खु,चे पोलीस पाटील किरण खामकर, इस्माईल बागवान, समाजिक कार्यकर्ते मोहसिन तांबोळी, अदनान बागवान, समीर शेख, भिमराव नन्नवरे, विठ्ठल पाटील, किरण कोळी, सचिन कोळी यांसह मान्यवरांनी जामा मस्जिद जवळील मैदान येथे भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत