Central Bank Bharati 2024

Central Bank Bharati : 10 वी पास उत्तीर्णांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; आजच करा अर्ज

नोकरी

मुंबई : बँकेत नोकरीची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) च्यावतीने तब्बल ४८४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे, इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ही बातमी पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे. अर्ज कसा आणि कुठे करायचा?, फी किती?, त्यासाठी पात्रता काय? यासारख्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत… चला वाचूया मग.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) च्यावतीने तब्बत ४८४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ (Safai Karmachari & Sub Staff Bharati) या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला २१ जून २०२४ पासून सुरुवात होणार असून २७ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. १० वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.

३१ मार्च २०२३ रोजी १८ ते २६ वर्षदरम्यान वय असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे. यात इतर मागास प्रवर्गा (OBC) तील उमेदवाराला ३ वर्ष तर अनुसुचीत जाती/जमाती (SC/ST) तील उमेदवाराला ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.

सर्वसाधारण (General) आणि इतर मागास प्रवर्गा (OBC) तील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ८५० रुपये तर अनुसुचीत जाती/जमाती, दिव्यांग, सेवानिवृत्त सैनिक आणि महिला (SC/ST/PWD/ExSM) उमेदवारांसाठी १७५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची जुलै ते ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.

जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/

अधिकृत संकेस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://centralbankofindia.co.in/en

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत