Railway Bharati 2024 : रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी

नोकरी

रेल्वेत (Railway Bharati) तब्बल ५ हजारांवर जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

नवी दिल्ली : रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदाच्या तब्बल 5 हजार 696 पदांसाठी (Railway Bharati) भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा करावा, यांसारखी सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ही बातमी सविस्तरपणे वाचणे गरजेचे आहे.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्यावतीने असिस्टंट लोको पायलट पदाच्या (ALP Bharati) 5 हजार 696 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 20 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 1 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील. यात अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 तर इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

अशी आहे शैक्षणिक पात्रता

असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot Bharati 2024) पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार किमान १० उत्तीर्ण तसेच आयटीआय (ITI) चे आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर यापैकी एक ट्रेड उत्तीर्ण किंवा 10 वी उत्तीर्ण + अधिक तीन वर्षांचा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या विषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तरपणे जाहीरात वाचावी.

जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://indianrailways.gov.in/

1 thought on “Railway Bharati 2024 : रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत