संधी दवडू नका; ‘तलाठी’ पदासाठी अर्ज करण्याला इतकेच दिवस शिल्लक

नोकरी

मुंबई :- राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने ‘तलाठी’ पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी २६ जून २०२३ पासून अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली असून लवकरच अर्ज सादर करण्याची मुदत संपणार आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या अनेक जागांसाठी शासनाकडून अर्ज मागविण्यात येत असतात. महसूल विभागाने देखील तलाठी पदाच्या तब्बल ४ हजार ६४४ जागांसाठी शासनाने भरती जाहीर केली असून २६ जून २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२३ रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटे असून इच्छुकांनी मुदतीच्या आत अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

अशी आहे पात्रता
महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी, कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि १७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरतील. मागासवर्गीय उमेदवारांना वयोगटात ५ वर्षाची सूट देण्यात आली आहे.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत