कापसावर मररोगाचा प्रादुर्भाव

कापसावर मररोगाचा प्रादुर्भाव

कृषी

पावसाअभावी पिके कोमजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीच्या संकट

जळगाव :- पावसाअभावी पिके कोमजत असतांना आता कापूस पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

यंदा मान्सून वेळेत दाखल होईल, असे भाकीत हवामान विभागाने वर्तविले होते. त्यामुळे आनंदीत झालेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी केली. काही शेतकऱ्यांनी आधीच तर काहींनी एक-दोन पावसानंतर कापसाची लागवड केली. मात्र, जिल्ह्यात अद्यापही पिकांसाठी पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पिके कोमजू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यंदा कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मुळकूजने शेतकरी चिंताग्रस्त
जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस या पिकाची चांगलीच वाढ होवून पीक सहा ते सात पानांवर आले आहे. यामुळे यंदा पीक चांगले येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र, वाढ होण्यापूर्वीच पिकावर मर रोग प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी मुळा पांढऱ्यापडून त्या कुजत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत