जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये अॅग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत

कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी रोबोट, ड्रोनचा वापर होणे गरजेचे – प्रा. शाळीग्राम

कृषी

जळगाव :- मुख्य पिकांच्या उत्पादनातील स्थिरता, महागडी बी-बियाणे व खते, अहवामानातील बदल आणि जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये अॅग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत इस्त्रो – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या स्पेस टेक्नॉलॉजी सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.ए.डी. शाळीग्राम यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भौतिकशास्त्र प्रशाळेमधील इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि अभ्यासमंडळ व अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अॅडव्हान्स इ-टेक्नॅालॉजी फॉर सोशियटल अप्लीकेशनस (NSEAET-2023) या विषयावरील कार्यशाळेत बीजभाषण करतांना ते बोलत होते.

जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये अॅग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत

उच्च व तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक आणि केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रा.शाळीग्राम पुढे बोलतांना म्हणाले की, रोबोटिक्सचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी संगणक व इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान गरजेचे आहे. तरूणांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे असून जी शेती करतांना अॅग्रीरोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे आहे. पिकांच्या खुरपणी कामी वेडींग रोबोट उपयोक्त ठरतील. विशिष्ट ऋतुमध्ये येणार फळे वर्षभर उपलब्ध होणेसाठी त्यांना डिहायड्रेशन करून निर्यात करण्यासाठी ॲग्री रोबोट महत्वाची भूमिका करू शकतात. सहाहजार रूपये किंमतीपासून काही लाख रूपये किंमतीचे रोबोट्स आहेत. लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी सामुहिकपणे अॅग्री रोबोटचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते, असेही ते म्हणाले.

तरुणांनी चाकोरीच्या पलीकडे जावे – अमळकर
केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी, तरूण संशोधकांनी चाकोरीच्या पलिकडे जात देशाच्या विकासात योगदान देणारे संशोधन करावे. उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारे पिके आणि त्यांच्या समस्या यावर संशोधन करावे, असे आवाहन केले.

कल्पनांचे अदान – प्रदान व्हावे – प्रा. महाजन
अध्यक्षीय भाषणात प्रशाळेचे संचालक प्रा. ए.एम. महाजन यांनी, कल्पनांचे अदान – प्रदान व्हावे व तरूण संशोधकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी राष्ट्रीय स्तरावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संजय घोष यांनी केले, डॉ.ए.एल. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे व डॉ. आर.जी. बावने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. डी.जे. शिराळे यांनी आभार मानले.

द्वितीय सत्रात वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथील डॉ. के.सी. पोरिया, पिलानी विद्यापीठ, राजस्थान येथील डॉ. शशिकांत सदीस्ताप, नागपूर विद्यापीठाचे डॉ. सतीश शर्मा यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले. यावेळी संशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व मॉडेलच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. के. डी. गायकवाड, डॉ. ललित पाटील, डॉ. एल. बी. पटवे आदींनी परिश्रम घेतले.

1 thought on “कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी रोबोट, ड्रोनचा वापर होणे गरजेचे – प्रा. शाळीग्राम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत