पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

कृषी महाराष्ट्र

भारत देश हा कृषिप्रधान देश हाय प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते.
भारतात 60% च्या वर लोक शेती या प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे. अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय बैल बकरी म्हैस यासारखे जनावरे पशुधन म्हणून पाळले जातात.यात प्रमुख प्रशासन म्हणून बैल या प्राण्याकडे पाहिले जाते.
प्राचीन काळापासून शेतकऱ्याला शेती व्यवसायात मदत करत असलेला बैल (सर्जा) हा शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्जाराजाचा सण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा करतात.महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा करतात. बैलपोळा सर्जाराजाचा वाढदिवसच. या दिवशी बैलांना सर्व कामापासून सुट्टी असते. भारतात बैलांच्या खूप जाती पाहायवास मिळतात. यात नंदी, खिल्लारी, नागोरी, मालवी, निमाडी, पोंवर, डोंगी, ओंगोल, जवरी, गवळव, सिंधी, राठी, गिर, वेचून, देवणी यासारख्या खूप जाती आहेत. यापैकी बऱ्याचशा जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी सारख्या राज्याच्या खांद्याला हळद व तुपाने मालिश केली जाते. त्यास खांदे मळणी म्हणतात. बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी नदी, तलाव, विहीर येथे आंघोळ घालून वेगवेगळे पद्धतीने सजावून त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते व गोड जेवण भरून बैलांची पूजा केली जाते.
यंदाच्या बैलपोळ्याला शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट तर त्याच्या पशुधनावरती लंपी आजाराचे संकट ओढावले आहे. आर्थिक संकटामुळे बैलपोळा सण शेतकरी साजरा करू शकत नाही. पशुधनाच्याबाबतीत जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात 281 दशलक्ष पशुधन आहे. अशा या पशुधनावर लंपी या आजाराने हल्ला केला असून यात आतापर्यंत साठ हजारावर जनावरे दगावली आहेत. लंपी हा त्वचेचा रोग असून संसर्गजन्य आहे. हा आजार प्रामुख्याने गुरांमध्ये होतो. लंपी हा रोग पॉक्सीव्हीरीडी परिवारातील कॅप्रीपॉक्स व्हायरस आहे. लंपी आजार मच्छर, डास, उवा यांच्या विशिष्ट प्रजाती चावल्यामुळे होतो. हा आजार एकापासून दुसऱ्या जनावरास होतो. 2019 मध्ये भारतात प्रथम या आजाराची लागण झाली. त्यामुळे अनेक गुरे दगावली.

अशी आहेत लंपी आजाराची लक्षणे :-

1) गुरांना ताप यणे
2) गुरांचे वजन कमी होणे
3) डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे
4) तोंडातून लाळ पडणे
5) शरीरावर गाठी येणे
6) गुरांचे तब्येत खराब होणे व दगावणे
वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ अर्थात WOAH ने लंपी आजाराची लक्षणे तसेच काही उपाय शेतकऱ्यांना सांगितले आहे.
यात गुरांच्या गोठ्यात माशाडा सुधारण्याची काळजी घ्यावी व स्वच्छता राखावी, यांचा वडासांचा प्रतिबंधात्मक उपाय करावा, निरोगी गुरांना लंपी बाधित गुरांपासून दूर (वेगळे ) ठेवणे, लंपी बाधीत गुरांना चरणासाठी बाहेर सोडू नये, गाई म्हशी वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे, गुरांचा लसीकरण करावे, ज्या गावात बाधित जनावरे आहेत अशा गावाच्या 5 किलोमीटर परिघातील 4 महिने वयावरील गाय, म्हैस, बैल आदी जनावरांना 1 ml प्रति गोट पॉक्स स्ट्रेन लस टोचाव्यात, प्रत्येक गुरांना वेगवेगळी सुई वापरावी, वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, लंपी बाधित गुरांचे दूध पिऊ नये. अशा पद्धतीने घाबरून न जाता काळजी घ्यावी आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

बैलपोळ्याच्या सणावर बळीराजास सुगीचे दिवस येवो, पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर होवो, अशी देवाकडे प्रार्थना करूया.

आकाश रविंद्रनाथ भालेराव,
रा. शेमळदे ता. मुक्ताईनगर
मो नं.  880678261

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत