Strike : चोपडा शहारात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

गुन्हे

कारवाईत (Strike) चार गुटखा विक्रेत्यांकडून १ लाख ६७ हजाराचा साठा जप्त

जळगाव :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, धुळे व जळगाव संयुक्त पथकाने गुरुवार ७ डिसेंबर रोजी कारवाई (Strike) करत चोपडा येथील चार गुटखा विक्रेत्यांकडून सुमारे १ लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करुन चारही दुकानांना सील केले आहे.

चोपडा शहरात सकाळी अन्न व औषध प्रशासनाने पथकाने ४ दुकानदारांची तपासणी करत महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन् पदार्थाचा साठा विक्रीकरता आढळून आल्यामुळे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा एकूण साठा सुमारे १ लाख ६७ हजार जप्त करुन दुकान मालक व साठा मालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

यांनी केली कारवाई

नाशिक विभाग सह आयुक्त सं.भा. नारगुडे, जळगाव सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी के.एच. बाविस्कर, आ.भा. पवार, गोपाळ कासार, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख, उमेश सुर्यवंशी यांनी ही कारवाई (Strike) केली .या गुन्ह्यांमध्ये मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न् व औषध प्रशासनाच्यावतीने गुटख्याविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत