रडार लाईव्ह न्युज । मुंबई
कोर्ट अर्थात न्यायालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court) च्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील ‘वाहनचालक’ (Driver Bharati) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ८ जागांसाठी ही भरती होणार असून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील न्यायालयात वाहन चालक (Driver Recrutment) म्हणून नोकरी करू इच्छित असाल तर मग ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या पदासाठी पात्रता काय?, अर्ज कसा आणि कुठे कारावा? यासारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीत मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला ही बातमी पूर्ण वाचणे गरजेचे आहे.
मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court) च्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापना विभागाकडून वाहनचालक (BHC Driver Bharati) पदासाठी मंगळवार, दि. १८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत रिक्त असलेली ५ व पुढील २ वर्षात रिक्त होणारी ३ पदे, अशा एकूण ८ पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला बुधवार, दि. १९ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात झाली असून ३ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर उमेदवारांना आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.
अशी आहे पात्रता
वाहन चालक (BHC Driver Bharati) पदासाठी अर्ज सादर करणारा उमेदवार उमेदवार कमीत कमी दहावी (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा, मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र.५९/१९८८) प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (Driving Licence) अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा, उमेदवाराकडे हलके किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा, उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे चारचाकी मोटार वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.
अशी आहे वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा २१ तर कमाल वयोमर्यादा ३८ तर अनुसूचित जाती/जमाती, इत्तर मागास प्रवर्ग आणि महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा २१ तर कमाल वयोमर्यादा ४३ आहे. न्यायालयीन आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा २१ तर किमान वयोमर्यादेची कोणतीही अट नाही. परीक्षा शुल्क २०० रुपये आकारण्यात येणार आहे.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
https://bhc.gov.in/nagdriverrecruit/home.php
अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी क्लिक करा
https://bhc.gov.in/