Congress Committee Aandolan

Congress Aandolan News : भाजपा विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी चिखल फेक आंदोलन

राजकारण

रडार लाईव्ह न्युज । रवंजे बु.

राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षा (BJP) चे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात आहे. राज्यातील जनता समस्यांच्या सामना करत असतांना सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करीत असल्याचा आरोप करत राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शुक्रवार, दि. २१ रोजी जळगाव येथे चिखलफेक आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (Jalgaon District Congress Committee) कडून देण्यात आली आहे.

काँग्रेस कमिटी (Congress Committee) कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात, राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षा (Bhartiya Janta Party) चे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित, अल्पसंख्यांक, महिला, तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे. सरकारी नोकरी भरती केली जात नाही, स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही, परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही, कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही, कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करीत आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांच्या सामना करत असताना सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करीत आरोप करण्यात आला आहे.

राज्यातील या निष्क्रिय सरकारच्या विरोधात शुक्रवार, दि. २१ रोजी दुपारी १ वाजता, काँग्रेस भवन येथे चिखलफेक आंदोलन करण्यात येणार असल्याचेही काँग्रेस कमिटी (Congress Commitee) चे जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. आंदोलनाला जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला, काँग्रेस युवक, सेवा दल, इंटक, सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत