निकेश राजपूत Nikesh Rajput BJP

जळगाव जिल्ह्यातील कलावंतांच्या समस्या मार्गी लावणार

राजकारण सांस्कृतीक

आढावा बैठकीत भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांचे कलावंतांना आश्वासन

जळगाव : जिल्ह्यातील कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या लवकरच कलावंताची नोंदणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांनी दिले.

BJP Meeting

सांस्कृतिक प्रकोष्ठ, जळगाव जिल्हाच्यावतीने सोमवार दि. १० रोजी जि.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजूमामा भोळे, भाजपच्या जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्य गीतांजली ठाकरे, ज्येष्ठ रंगकर्मी योगेश शुक्ल, अरविंद देशमुख, सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष विशाल जाधव, जिल्हाध्यक्ष पवन खंबायत यांसह मान्यवर उपस्थित होते.

आढावा बैठकीत कलावंतांनी त्यांना येणाऱ्या समस्या, भेडसावणारे प्रश्न, योजनांचा न मिळणारा लाभ यासारख्या विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. बैठकीला प्रदीप भोई, आकाश पाटील, अजय खंगार, चेतन बडगुजर, राहुल बडगुजर, राहुल पवार, अरुण सानप, भास्कर जुनागडे, मालती जुनागडे, शीतल तायडे, सरिता तायडे, प्रा. रत्नाकर कोळी, निरंजन पाटील, शशिकांत चौधरी, सनी कापुरे, गजानन ठाकूर, मनोज विश्वे, प्रकाश लिंगायत, जगदीश गंगावणे, मोहित पाटील, रोहित ठाकरे, विक्रम कापडणे, विवेक कोळी, आकाश राजपूत, बंटी खरात, काशिनाथ म्हस्के, भूपेंद्र ठाकरे आदी कलावंत उपस्थित होते.

कलावंतांची होणार नोंदणी
सरकारच्यावतीने कलावंतांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत कलावंतांनी बैठकीत व्यक्त केली. त्यावर प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांनी कलावंतांचे संघटन व्हावे, त्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने लवकरच कलावंत नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केल्यानंतर तो कलावंत कोणत्या योजनेत बसतो याची माहिती देऊन पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

बैठकीचे सूत्रसंचालन व आभार जिल्हाध्यक्ष पवन खंबायत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत