Karandada Patil

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

महाराष्ट्र राजकारण

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत

चाळीसगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर महिलांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तरुणांमध्ये एवढा उत्साह संचारला होता की, तरुणांनी चक्क करणदादा पाटील, खा. उन्मेषदादा पाटील यांना खांद्यावर घेत गावातून रॅली काढली.

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा, भडगाव, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव तालुका पिंजून काढला आहे. ते त्या-त्या तालुक्यातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने गावा-गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्वतः करणदादा पाटील नागरिकांच्या भेटी घेत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

शनिवार, दि. ४ रोजी खा. उन्मेषदादा पाटील, माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या साथीने चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींना इतका अभूतपूर्व प्रतिसाद लाभला की, काही तरुण कार्यकर्त्यांनी करणदादा पाटील यांना चक्क खांद्यावर घेऊन प्रचार रॅली काढली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत