धरणगाव तालुक्यात घुमला ‘एकच वादा.., करण दादा’चा नारा

राजकारण

कवठळ, चोरगाव, धार, शेरी, निमखेडा, झुरखेडा, पथराड येथील प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद

धरणगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवार, दि. २५ रोजी धरणगाव तालुक्यातील कवठळ, चोरगाव, धार, शेरी यासह विविध गावांना भेटी देऊन प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलींना सर्वच ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थानी स्वयंस्फूर्तीने या रॅलींमध्ये सहभागी होत एकच वादा… करण दादा.., करणदादा पाटील… दिल्लीला जातील, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

गुरुवार, दि. २५ रोजी कवठळ, चोरगाव, धार, शेरी, निमखेडा, झुरखेडा, पथराड आदी गावांत प्रचार रॅली काढण्यात आल्या. कवठळ येथे कालिका माता मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील घरोघरी जाऊन ‘मशाल’ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला ग्रामस्थानी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर चोरगाव, धार, शेरी या गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात येऊन मतदारांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

झुरखेडा येथे फटाक्यांची आतषबाजी करून करणदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वयंभू महादेव मंदिरात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व युवासेनेचे धरणगाव तालुकाध्यक्ष निलेश चौधरी यांच्याहस्ते नारळ ओवाळून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मविआचे उमेदवार करणदादा पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले.

पथराड येथे विठ्ठल-रुख्माईंचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रचार रॅली दरम्यान, ठिकठिकाणी करणदादा पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चव्हाण, पवन पाटील, धनराज पाटील, रघुनाथ बोरसे, सचिन बोरसे, शालिक पाटील, बळीराम पाटील, आनंद चव्हाण, बाबुराव पाटील, दीपक पाटील, प्रदीप पाटील, हर्षल पाटील, सुनील बोरसे, श्रीकांत लंके यांसह अनेक ग्रामस्थाच्या घरी करणदादा पाटील यांचे औक्षण करण्यात आले. रॅली दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन तर संकटमोचन हनुमान मंदिर व श्री. स्वामी समर्थ केंद्राला भेट देऊन विजयाचे साकडे घालण्यात आले. श्री. स्वामी समर्थ केंद्रात टाळ्यांच्या गजरात करणदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे धरणगाव तालुकाध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही.डी.पाटील, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, पाळधी येथील उदयोजक दिलीप पाटील, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील, दिलीप आण्णा धनगर, रघूनाना पाटील, पथराडचे माजी सरपंच सुपडू पाटील, मनोज पाटील, प्रशांत पाटील, भुषण पाटील, शालिक पाटील, भरत पाटील, छोटू पाटील, विकास चव्हाण, पवन पाटील, सुनील बोरसे, राजू काकडे, गोपीनाथ पाटील, विजय बोरसे, वना पाटील, प्रवीण तोंडे, आनंद चव्हाण यांसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत