Ray Nagar Solapur : अनेक देश महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक

महाराष्ट्र राजकारण

रे नगर (Ray Nagar) येथील कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

सोलापूर : दावोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रे नगर (Ray Nagar) येथे दिली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर (Ray Nagar) येथे प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत घरकुल वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख तसेच रे नगर (Ray Nagar) हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pradhanmantri Naredra Modi) यांचा मोठा हातभार आहे. राज्यात अनेक पायाभूत विकासाचे प्रकल्प येत आहेत. दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेते, प्रशासक, उद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या. त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून श्री. मोदी हे संपूर्ण जगात देशाचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला.

पंधरा हजार नागरिकांना हक्काचे घर

सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर (Ray Nagar) येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रे नगर (Ray Nagar) फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक करतांना या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.

1 thought on “Ray Nagar Solapur : अनेक देश महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत