Talathi Result : तलाठी भरती २०२३ ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर

नोकरी महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (Talathi Result) शनिवार (दि.६) रोजी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन आठवड्यात उमेदवारांची अंतिम निवड यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्यावतीने तलाठी (Talathi Result) पदाच्या ४ हजार ४६६ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले होते तर त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.

दरम्यान, भूमी अभिलेख कार्यालयाकडून नुकतीच गुणवत्ता यादी (Talathi Result) जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन आठवड्यात अंतिम निवड यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे. पेसा अर्थात आदिवासीबहूल क्षेत्रातील रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्या १४ जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने नंतर करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा. https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत