का? घेतलाय बोर्डाने हा निर्णय; वाचा सविस्तर बातमी
पुणे : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांना (Board Exam) लवकरच सुरुवात होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) ची परीक्षा (Board Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात इयत्ता बारावीची (HSC Exam) तर मार्च महिन्यात इयत्ता दहावीची (SSC Exam) लेखी परीक्षा (Board Exam) घेतली जाते. यावर्षी देखील 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत बारावीची (HSC Exam) तर 1 ते 26 मार्च 2024 या कालवधीत दहावीची (SSC Exam) लेखी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा (Board Exam) घेण्यात येणार आहे. (Maharashtra Board Exam: Students will get 10 minutes extra time in board exam)
विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून या परीक्षांकडे पाहिले जात असल्याने विद्यार्थी व पालकांकडून देखील या परीक्षांना महत्व दिले जाते. मागील काही वर्षांपर्यंत परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, यासाठी परीक्षेच्या (Board Exam) निर्धारीत वेळेच्या 10 मिनिटेअगोदर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात येत होती. मात्र, प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना घडल्याचे निदर्शनास आल्याने तसेच अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, परीक्षा (Board Exam) निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे.
निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे
परीक्षेच्या (Board Exam) निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा रद्द झाल्यानंतर अतिरिक्त 10 मिनिटे देण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे दिली जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेची (Board Exam) सध्याची असलेली सकाळी 11 ते दुपारी 2, सकाळी 11 ते दुपारी 1, सकाळी 11 ते दुपारी 1.30 ची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:10, सकाळी 11 ते 1:10 व सकाळी 11 ते दुपारी 1.40 अशी असणार आहे.
1 thought on “Maharashtra Board Exam : बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटे अतिरिक्त वेळ”