World Vision India

World Vision India Upkram : चित्रांच्या माध्यमातून मुलांना स्व:रक्षणाचे धडे

सामाजिक

वर्ल्ड व्हिजन इंडियाचा उपक्रम; ३५ बाल गटातील मुलांना खेळाच्या साहित्याचे वाटप

प्रमोद परदेशी | धरणगाव : वर्ल्ड व्हिजन इंडिया (World Vision India) व धरणगाव तालुक्यातील बाल गटांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनासह चित्रांच्या माध्यमातून स्व:रक्षणाचे (Self Defence) धडे देण्यात आले. यावेळी ३५ बाल गटांना खेळांचे साहित्य देखील वितरीत करण्यात आले. (Self-defense lessons for children through pictures)

वर्ल्ड व्हिजन इंडिया (World Vision India)vया संस्थेतर्फे बाल संरक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार (दि.९) रोजी संस्थेच्यावतीने धरणगाव तालुक्यातील २३ गावांमधील ४० बाल गटांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशिक्षण सभागृहात ही बैठक पार पडली. बैठकीत प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी बालकांचे अधिकार, त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास, मुलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, गटाचे मूल्यांकन कसे करावे, यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपस्थित मुलांमध्ये चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येऊन स्व:रक्षणाची शपथ देण्यात आली.

बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती मुकुंद नन्नवरे उपस्थित होते. यावेळी यांच्या हस्ते ३५ बाल गटांना खेळाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. बैठकीला वर्ल्ड व्हिजन इंडियाचे (World Vision India) रतीलाल वळवी, अंकीता मेश्राम, विजेश पवार, निखिल कुमार, स्वयंसेवक वैष्णवी पाटील, आरती पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील, आर.इ.सी, सुपरवायझर मनीषा पाटील यांसह धरणगाव तालुक्यातील २३ गावांमधील ३५ बाल गटांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत