Marathi Sahitya Sammelan

Bal Sahitya Sammelan : बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

महाराष्ट्र सांस्कृतीक

बालसाहित्याला (Bal Sahitya Sammelan) विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद

सानेगुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : बाल साहित्यातील (Bal Sahitya Sammelan) कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख याने आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कलाआनंद बाल मेळाव्याचे आज गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले त्यावेळी तो बोलत होता.

तो पुढे म्हणाला की, बालसाहित्यातून (Bal Sahitya Sammelan) उद्याचा युवक घडणार आहे. वयानुसार माणसाच्या जाणिवा हळूहळू प्रगल्भ होतात. त्याला मिळणाऱ्या अनुभवावर त्याचा विचारांचा पाया पक्का होत असतो. प्रत्येकाला समान अनुभव येतीलच असे नसते आणि आलेल्या अनुभवातून प्रत्येक जण सारखाच वैचारिक परिणाम, प्रतिसाद दाखवेल असेदेखील नसते. अशावेळी येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवातून नेहमी सकारात्मक विचार पुढे यावा आणि सुदृढ मानसिकतेची बांधणी व्हावी हे महत्त्वाचे असते. (Children’s literature creates the youth of tomorrow)

याप्रसंगी व्यासपीठावर बालसाहित्यकार बालमेळावा (Bal Sahitya Sammelan) समन्वयक एकनाथ आव्हाड, माया धुप्पड, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषा तांबे, बालअध्यक्ष्ा शुभम सतीश देशमुख (चाळीसगाव), उद्घाटक पियुषा जाधव (जळगाव), स्वागताध्यक्षा दीक्षा राजरत्न सरदार, साने गुरुजींच्या पुतनी सुधाताई साने, मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेंहदळे, कार्याध्यक्ष्ा प्रा. डॉ. अविनाश जोशी आदी उपस्थित होते.

कलाआनंद बाल मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात 97 व्या साहित्य संमेलनानिमित्ताने (97th Sahitya Sammelan) साने गुरुजी विद्यालयाच्या 97 विद्यार्थ्यांनी ‌‘खरा तो एकच धर्म’ ही पूज्य साने गुरुजी यांची कविता सादर केली. यावेळी त्यांना केतन जोशी यांनी तबल्यावर, योगेश पाटील यांनी बासरीवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी साथसंगत केली.

गोविंदा आला रे…
उद्घाटनानंतर सुविचार हंडी फोडण्यात आली. हंडी फोडण्याआधी विद्यार्थ्यांनी ‌‘गोविदा आला रे आला…’ (Govinda Aala Re Aala) या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेका धरला होता. ही हंडी वेदांत पाटील याने फोडली. या सुविचार हंडीत खानदेशातील शाळांमधून सुविचार मागविण्यात आले होते. हंडी फुटल्यानंतर हे सुविचार लिहिलेल्या चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन नेहा शिवाजी पाटील, भाविका सुरेश वाल्हे यांनी केले. भार्गवी प्रमोद नालंदे हिने प्रा. उषा तांबे यांचा परिचय करून दिला. दिव्याणी रूपेश साळुंखे हीने एकनाथ आव्हाड यांचा परिचय करून दिला. आभार कृष्णा पवार याने मानले. बालमेळाव्याचे मुख्य समन्वयक एकनाथ आव्हाड प्रास्ताविकात म्हणाले, की हा बालमेळावा (Balmelava) मुलामुलांना जोडण्याचे काम करेल, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवेल व विविध बालसाहित्य प्रकारांचे दर्शन घडवेल.

स्वागताध्यक्ष दीक्षा सरदार हिने आपल्या भाषणात बालमेळाव्यातील (Bal Melava) कलाकारातूनच उद्याचे यशस्वी कलाकार निर्माण होणार आहेत, असे मत व्यक्त केले. आजच्या विद्यार्थ्यांनी या वयात साहित्यिकांची व साहित्याची ओळख झाली तर भविष्यातील सुजाण नागरिक तयार होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

बालमेळाव्याचे (Bal Melava) उद्घाटन पियुषा गिरीश जाधव यांनी केले. त्यांनी साहित्यातील ग्रंथांमध्ये डोकवतांना स्वत:मध्ये डोकावण्याची प्रेरणा मिळते. एकदा स्वत:ला गसवलो की, जगण्याचे अन्वयार्थ आपोआप उमगतात. जगण्याचे अन्वयार्थ उमगले की जगायचं कसं हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे तिने सांगितले. नांदेडच्या बिलोली आंतरभारती शिक्षण संस्थेचे 50 विद्यार्थी सहा शिक्षकांसह खास या बालसंमेलनासाठी हजर झाले.

3 thoughts on “Bal Sahitya Sammelan : बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत