Ration Dukandar Aandolan

स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सामाजिक

मागण्या मान्य न झाल्यास…; निदर्शनकर्त्यांनी दिला सरकारला इशारा

रडार लाईव्ह न्युज । प्रतिनिधी

रेशन दुकानदारांवर कारवाईचा बडगा दाखवून, त्यांना दबावाखाली ठेवून, दुकानदाराला कोणताही मोबदला न देता बळजबरीने काम करून घेण्याचा शासनाने घाट घातल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवाना धारक संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या धोरणांचा निदर्शनकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये आजच्या महागाई निर्देशांकानुसार किमान १०० रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवाना धारक संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासनाने मोफत धान्य योजना लागू केली. त्यानंतर संघटनेची बैठक घेऊन वाटपाच्या संदर्भातील शासनाने ठरवून दिलेले मार्जिन वेळेवर दिले जाईल. परंतु, ६-६ महिने मार्जिन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही मार्जिन मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली कमी धान्य देऊ दुकानदारांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप देखील निदर्शनकर्त्यांकडून करण्यात आला.

अन्यथा धान्य वितरण बंद
आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास ८ जुलै रोजी राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आदोलन, निदर्शने करून राज्य शासनाला निवेदन सादर करतील. त्यानंतरही शासनाने आमच्या मागण्यांबाबत कोणलाही निर्णय न घेताल्यास १ ऑगस्टपासून राज्यातील सर्व ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वितरण करणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनात, संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील राठी, भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, पाचोरा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रशांत भालशंकर, चोपडा तालुकाध्यक्ष विकास पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष सेजराव बोरसे, एरंडोल तालुकाध्यक्ष पुनिष मंत्री, बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत निकम, पारोळा तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष आर.डी. पाटील, बाजीराव बोडवडे यांसह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत