दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना 50 लाखांची मदत द्या!

सामाजिक

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलची मागणी; चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन

चाळीसगाव : शहर प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झाला तर 32 भाविक जखमी झाले आहेत. या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख तर जखमी भाविकांना दहा लाखाची मदत करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलतर्फे करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांकडून चाळीसगाव तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात भाविकांच्या बसवर झालेला हल्ला, मणिपूर येथे होत असलेला हिंसाचार, पंजाबमध्ये वाढलेला उग्रवाद यासारख्या घटनांमुळे आतंकवाद्यांचे मनोबल वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील धार्मिक यात्रेकरूंना सुरक्षा पुरवली जावी, त्याचबरोबर वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी अविनाश, कुलकर्णी, राहुल चौधरी, संदीप लांडगे यांच्यासह आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत