Khadke School

खडके विद्या मंदिरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

शैक्षणिक

जळगाव : येथील स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय हिंद, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा, अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील पवार, ज्येष्ठ शिक्षिका वंदना धुमाळ व स्वाती चौधरी आदींच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शिक्षिका सुजाता नेमाडे यांनी नेताजीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, आझाद हिंद सेनेचे कार्य तसेच त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत