दक्षिण मुखी हनुमान मंदिर सत्संग भजनी मंडळाच्या भजनात दंग झाले भाविक

विशेष

जळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. जळगावात देखील असाच उत्साह सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर सत्संग भजनी मंडळाच्यावतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभागी होत, रामनामात दंग झाले होते.

मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसादाचे देखील भाविकांना वाटप करण्यात आले. भाविकांसह शेकडो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्यावतीने गेल्या ५१ वर्षापासून धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक शिक्षण युवकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. प्रत्येक शनिवारी तसेच एकादशीच्या दिवशी भजन आणि सुंदर कांड पाठचे देखील मंडळाकडून आयोजन करण्यात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत