अग्निवीर योजनेविषयी 15 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन

नोकरी

जळगाव:- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने संरक्षण क्षेत्रातील अग्निवीर योजनेविषयी मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी (दि.15) दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत हे मार्गदर्शन सत्र होणार असून यात https://meet.google.com/tke-rgrx-hba या लिंकवर जाऊन सहभागी होता येणार आहे. मार्गदर्शन सत्रात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक अनुरथ वाकडे  हे ‘अग्निवीर’ योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. या मार्गदर्शन सत्राचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत