अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
मुंबई :- बँकेत नोकरी करू इच्छिणऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर पदाच्या ४०० जगांसाठी भरती निघाली असून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.
बँकेत नोकरी लागावी, अशी प्रत्येक तरुण किंवा तरुणीची इच्छा असते. त्यासाठी ते रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट देखील बघत असतात. परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदाच्या तब्बल ४०० जागांसाठी भरती निघाली आहे. यात ऑफिसर – स्केल III पदाच्या १०० तर ऑफिसर – स्केल II) पदाच्या ३०० पदांचा समावेश आहे.
ऑफिसर – स्केल III या पदासाठी २५ ते ३८ वयोगटातील, कोणत्याही शाखेतील पदवी (६० टक्के गुण) किंवा सी.ए/सी.एम. ए/सी. एफ.ए परीक्षा उत्तीर्ण व ५ वर्ष अनुभव असलेले तर ऑफिसर – स्केल II) या पदासाठी २५ ते ३५ वयोगटातील कोणत्याही शाखेतील पदवी (६० टक्के गुण) किंवा सी.ए/सी.एम. ए/सी. एफ.ए परीक्षा उत्तीर्ण व ३ वर्ष अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. एस.सी, एस. टी प्रवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेला सुरुवात
गुरुवार दि. १३ पासून या दोनही पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून २५ जुलैपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज सादर करतांना जनरल, ओबीसी आणि इडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांकडून ११८० तर एस.सी, एस. टी प्रवर्गातील उमेदवारांना ११८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा.