आता घरबसल्या मतदार यादीत नाव करा समाविष्ट

हॅपनिंग

मतदारांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव :- नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूक विषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप उपयुक्त आहे. त्यामुळे मतदारांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे हे ॲप तयार करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता सदर ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे. अथवा अस्तित्वात असलेले मतदार यादीतील नावात दुरूस्ती व फोटोंमध्ये बदल ही करता येतो. मयत मतदाराचे नावे नातेवाईक वगळणी देखील करू शकतात.‌ तसेच  घरपोच मोफत मतदान ओळखपत्र‌ ही मिळवता येणार आहे.

गुगल प्ले स्टोअर वरील https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत