Rajya Balnatya Spardha: नाटकांमधून पर्यावरण, शिक्षण आणि नात्यांवर भाष्य

विशेष महाराष्ट्र

बालकांच्या दर्जेदार सादरीकरणाने (Balnatya Spardha) जिंकली रसिकांची मने

जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बाल कलाकारांनी पर्यावरण, शिक्षण, आई-वडील आणि पाल्यांमधील नाते, भाषा यासारख्या विषयांवर भाष्य करत आपल्या दर्जेदार अभिनयाचा अविष्कार घडविला. रसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत या बालकराकरांचा उत्साह वाढवला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० व्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव केंद्रावर करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा आज (दि.१७) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी देखील ६ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकांमधून या कलाकारांनी पर्यावरण, शिक्षण, पालक आणि पाल्य यांच्यातील नातं यावर प्रकाश टाकला. (Rajya Balnatya Spardha: Commentary on Environment, Education and Relationships through Plays)

‘अ ते ज्ञ’ने उलगडला आई-वडिलांच्या रागामागील प्रेमाचा अर्थ

आजकालची मुलं आई-वडिलांच्या जराशा रागवण्याने नाराज होतात, त्यांना उलट उत्तरे देतात. चुकीच्या पध्दतीने भाषा बोलतात. मात्र, आई-वडिलांच्या या रागविण्यामागे देखील प्रेम असते… या प्रेमाचा अर्थ समजविण्याचा प्रयत्न जळगाव येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या बाल कलाकारांनी ‘अ ते ज्ञ’ या नाटकाच्या (Balnatya Spardha) माध्यमातून केला. जिगू, क्रीश, चिंगी, सोनू, वेदी यांना मांजर, वाघ आणि मोगली भेटतात आणि त्यांना आपल्या आई-वडिलांच्या रागवण्यामागच्या प्रेमाचा अर्थ सांगतात. सोबतच मराठी भाषा व आई-वडिलांच्या प्रेमाच्या भाषेबाबत शिकवण देऊन जातात.

क ला का ना का..: या नाटकात (Balnatya Spardha) एका शालेय मुलीला ‘छत्रपती शिवाजी महाराजांना लिहीता, वाचता यायच का?’ हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचा शोध घेण्याचा ती खुप प्रयत्न करते. हा शोध घेत असतांना तिच्यासमोर अनेक अडचणी, आव्हाने उभी राहतात. मात्र, अतिशय छोट्याश्या गोष्टीतून तिला याचे उत्तर सापडते. नंदुरबार येथील सातपुडा शैक्षणिक व सामाजिक बहुद्देशीय संस्थेने या नाटकाचे सादरीकरण  केले.

जय हो फॅन्टसी : जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने सादर केलेले हे नाटक (Balnatya Spardha) कल्पना आविष्कारावर अवलंबून असून त्यात विविध काल्पनिक पात्रांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लहान बालकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य देण्याचा व विज्ञानाच्या या जगात संस्काराची शिकवण बालकांना देण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला आहे.

बदलु आम्ही गोष्टीला : भुसावळ येथील विवेकानंद विद्यामंदिरने सादर केलेल्या या नाटकात (Balnatya Spardha) मुलांना शिकविल्या जाणाऱ्या गोष्टीतून त्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांविषयी गोष्ट सांगत असताना जर आपण त्या गोष्टीचा शेवट बदलला तर प्रदूषण टाळेल का? असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात येतो आणि विद्यार्थी शिक्षिकेला थांबवून गोष्टीचा शेवट बदलण्याचा निर्णय घेतात आणि त्या गोष्टीत शिरून गोष्टीचा शेवट आनंदी करतात, असा या बालनाट्याचा आशय आहे.

मॅडम : जळगाव येथील विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलने सादर केलेले हे नाटक (Balnatya Spardha) ग्रामीण भागातील कुटूंबावर आधारीत आहे. एक अशिक्षीत आई तिच्या मुलीला शिकवण्यासाठी करत असलेली धडपड विनोदी शैलीतून मांडण्यात आली आहे.

आम्ही आहोत निराळे : भुसावळ येथील कलाविष्कार संस्थेने सादर केलेल्या या नाटकात (Balnatya Spardha) जैवविविधतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

रसिकांचा वाढता प्रतिसाद

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला दिवसेंदिवस रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. शालेय विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक बालकलाकारांची कला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. आपल्या पाल्यांमधील कला गुणांना वाव मिळावा, बाल बालकलाकारांची कला पाहून त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी काही पालक आपल्या पाल्यांना घेवून नाटक पाहण्यासाठी येत असल्याचेही दिसून येत आहे.

आज या नाटकांचे सादरीकरण

गुरुवार (दि.१८) रोजी सकाळी १० वाजता एलियन्स द ग्रेट, ११.१५ वाजता शोध अस्तित्वाचा, दुपारी १२.३० वाजता खेळ, दुपारी १.४५ वाजता आई मला छोटीशी बंदूक दे ना, ३ वाजता वारी, ४.१५ वाजता मारुतीची जत्रा, या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत