CRPF Recruitment 2024 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी

नोकरी

नवी दिल्ली : भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF (Central Reserve Police Force) मध्ये कॉन्स्टेबल (General Duty) पदाच्या १६९ जागांसाठी भरती (CRPF Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. Sports Quota अंतर्गत ही भरती होणार असून १० उत्तीर्ण उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे. १० वी उत्तीर्ण आणि जाहिरातीत दिलेल्या संबंधित खेळाच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडूच अर्ज करु शकतील.

अशी आहे वयमर्यादा

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते २३+५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना वयात १० तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ८ वर्ष सुट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जावून अर्ज सादर करू शकतात.

जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा 👇👇

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇

https://crpf.gov.in/

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇

https://recruitment.crpf.gov.in/

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत