तरुणांनो संधी दवडू नका; आजच अर्ज करा
मुंबई :- भारतीय पोस्ट खात्याने (Indian Post Office) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध पदांसाठी भरती केली जात आहे. आता देखील पोस्ट खात्याने ५० किंवा शंभर नव्हे तर तब्बल ३० हजार जागांवर भरतीसाठी (Recruitment) जाहिरात काढली आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय पोस्ट विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
राज्यातच नव्हे तर देशभरात गेल्या काही वर्षांपासून शासकीय विभागात नोकर भरती खूप कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे आज न उद्या एखादी मोठी भरती निघेल अशा प्रतीक्षेत तरुण आहे. परंतु, या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण भारतीय पोस्ट खात्याने तब्बल ३० हजार ४१ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या दोन पदांसाठी ही भरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अशी आहे पात्रता
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या दोनही पदांसाठी शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण असून मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे देखील अनिवार्य आहे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. २३ ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत आहे.
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी क्लिक करा.