MUCBF Bharati 2024 : सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती

नोकरी

मुंबई : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (MUCBF) ने नोकरीची मोठी संधी उपलब्ध केली आहे. नांदेड येथे मुख्यालय असलेल्या एका सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदाच्या १५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MUCBF मार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला १० जानेवारीपासून सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना २२ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर २०२३ रोजी २२ ते ३५ वर्षे वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी पात्र आहेत. उमेदवारांकडून ११८० इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM ई.) बँकिंग, सहकार, कायदेविषयक पदवी असलेल्यांना प्राधान्य असणार आहे.

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://mucbf.com/

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://rect-116.mucbf.in/

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत