नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी भरती

नोकरी

थेट मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा काय आहे पात्र

मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation Recruitment) शिक्षक पदाच्या १८३ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिक या दोनही विभागातील शिक्षकांचा समावेश असून थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

जगात शिक्षकाला अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षकाला गुरूचा दर्जा देखील दिला जातो. जगात हे काही महापुरुष घडून गेले आहेत, त्यांना घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अनेक जण लहानपणापासूनच शिक्षक होण्याचे स्वप्न बागळून असतात. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे. अशांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

तब्बल १८३ पदांसाठी तासिक तत्वावर आणि थेट मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. यात १२३ पदे ही प्राथमिक शिक्षक तर ६० पदे ही माध्यमिक शिक्षकाची आहेत. प्राथमिक शिक्षक पदासाठी बारावीनंतर डी.एड व टीईटी किंवा सिटीईटी परीक्षा उत्तीर्ण तर माध्यमिक शिक्षक पदासाठी ५० टक्के गुणांसह बी.ए.बी.एड किंवा बी.एस.सी.बी.एड उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत