मुंबई :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती निघाली असून २१ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. कोणती आहेत पदे?, काय आहे शिक्षणाची अट? वाचा सविस्तर बातमी.
आपल्यालाही नोकरी मिळावी, यासाठी हजारो तरुण विविध विभागात निघणाऱ्या नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असतात. सध्या अनेक विभागात भरती देखील सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात देखील ज्युनियर रिसर्च फेलो, सिनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदाच्या ५६ जागांसाठी भरती निघाली आहे. ज्युनियर रिसर्च फेलो पदाची २९, सिनियर रिसर्च फेलो पदाची १७ तर रिसर्च असोसिएट पदाची १० पदे भरली जाणार आहेत.
ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी १८ ते २७ वयोगटातील व केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण, सिनियर रिसर्च फेलो पदासाठी १८ ते ३० वयोगटातील व केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तर रिसर्च असोसिएट पदासाठी १८ ते ३५ वयोगटातील पिएचडी (केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुकांना २१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.