जळगाव जिल्हा पत्रकार संघतर्फे माजी मंत्री एम.के. अण्णा पाटील यांचा सत्कार

सामाजिक

रडार लाईव्ह न्यूज : प्रतिनिधी

जळगाव : माजी केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब एम. के. अण्णा पाटील यांना नवी दिल्ली येथे जागतिक ग्लोबल फ्युल अवार्ड देवी सन्मानित केल्याबद्दल जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार, दि. १८ रोजी पत्रकार भवनात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पत्रकार भवन समितीचे विश्वस्त अशोक भाटीया, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष पांडुरंग महाले, ग्रामीणचे अध्यक्ष भिका चौधरी, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे सदस्य कमलाकर वाणी आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, पत्रकार भवनातील सत्कार हा प्रेमाचा सत्कार असून आपल्या घरच्या माणसांनी केलेल्या सत्कार असल्यामुळे याचे महत्त्व वेगळेच आहे. आपल्यातील जिव्हाळा कायम असून असाच यापुढे ही राहावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. या कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत