Anti Corruption Action

गाळा नावावर करण्यासाठी मागितली ५ लाखांची लाच

गुन्हे

यावल येथील पतसंस्थेच्या प्रशासकास रंगेहाथ अटक; धुळे येथे झाली कारवाई

जळगाव :- गाळा आणि त्याची अनामत रक्कम नावावर करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणाऱ्या यावल येथील एका पतसंस्थेच्या प्रशासकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली. धुळे येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सावदा नगरपालिकेअंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलात गाळा असून या गाळ्याच्या कर्जाचे हप्ते थकल्याने श्री. महालक्ष्मी नागरी सहकारी पतंसंस्थेने हा गाळा जप्त केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी थकीत कर्जाची फेड करून संबंधीत गाळा आणि त्याची अनामत रक्कम नावावर करून देण्याची विनंती पतसंस्थेचे प्रशासक सखाराम कडू ठाकरे (वय – ५६, रा. पाचोरा) यांच्याकडे केली होती. दरम्यान, गाळा आणि अनामत रक्कम नावावर करून देण्याच्या बदल्यात ठाकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती.

धुळे येथे कारवाई
ठाकरे यांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून सखाराम ठाकरे यांना धुळे येथे लाच घेतांना रंगेहात अटक केली. लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद काटके, पोलीस शिपाई संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत