murder

धक्कादायक : मुलाचा खून करून पित्याने घेतला गळफास

गुन्हे

भडगाव तालुक्यातील शिवनी येथील घटना धक्कादायक घटना

भडगाव :- पैसे मागितल्याचा बापानेच मुलाचा खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील शिवनी येथे नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय चव्हाण (वय – ४८) हे त्यांचा बारा वर्षीय मुलगा कौशिक चव्हाण याच्या सोबत भडगाव तालुक्यातील शिवनी येथे वास्तव्यास आहेत. कौशिक हा पैसे मागत असल्याने तसेच माघारी बोलत असल्याने संजय यांना त्याचा येवून त्यांनी शेतातील पत्री शेडमध्ये खाटेवर झोपलेल्या कौशिक याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर संजय यांनीही स्वतः झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ जुलै रोजी ही घटना घडली होती.

खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी सुरुवातीला भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अधिक तपास व साक्षीदारांच्या जबाबानंतर संजय चव्हाण यांनी मुलगा कौशिक यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने मयत संजय चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात आले. त्यानुसार भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत