Crime News

Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदारालाही अटक

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; संशयिताची कारागृहात रवानगी

जळगाव :- दोघांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदासरास एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हिमांशू शशिकांत कुटे (वय – २५, रा. महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे दोघे मित्र मंगळवार, दि.११ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात बसलेले असतांना दुचाकी (क्र. एम. एच. १९, डी. एम. ३२७८) वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २९ हजार रुपये व १० हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुरुवार, दि. १३ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिनाभरापासून होता फरार
या गुन्ह्यात पोलिसांकडून यापूर्वी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर त्यांच्या चौथा साथीदार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद हा फरार झाला होता. दरम्यान, त्याचा शोध सुरु असतांना तो शाहूनगर येथे आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शनिवार, दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री सापळा रचून त्यास अटक केली.

या पथकाने केली कामगिरी
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर त्यास रविवार, दि.१३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंढे करीत आहेत.

3 thoughts on “Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदारालाही अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत