krushisevak Bharati 2023

Krushi Sevak Bharati 2023 : राज्यात कृषीसेवक पदाच्या 2109 जागांसाठी भरती

नोकरी

मुंबई :- कृषी विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने कृषीसेवक (Krushi Sevak Bharati 2023) पदाच्या 2109 जागांसाठी भरती (Krushi Sevak Recrutment) जाहीर करण्यात आली असून लवकरच अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाच्यावतीने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये बम्पर भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत संपत नाही तोच विविध जिल्ह्यातील कृषी विभागात देखील कृषीसेवक (Krushi Sevak) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे आदी जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे.

अशी आहेत जिल्हानिहाय पदे
राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या 2109 जागांमध्ये विविध जिल्ह्यातील जागांचा समावेश आहे. यात अमरावती जिल्ह्यासाठी 227, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 196, कोल्हापूरसाठी 250, लातूरसाठी 170, नागपूरसाठी 448, नाशिकसाठी 336, पुणेसाठी 188 तर ठाणे जिल्ह्यासाठी 294 जागांचा समावेश आहे.

अशी आहे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि शुल्क
कृषीसेवक पदासाठी शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा, पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य शिक्षण घेतलेले व 19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गीय उमेदवारांना वयोगटात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. अर्ज सादर करतांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

लवकरच तारीख होईल जाहीर
राज्य शासनाकडून भरती जाहीर करण्यात आली असली तरी अर्ज करण्याची तसेच अंतिम दिनांक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख देखील कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : क्लिक करा

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी : क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी : क्लिक करा

अभ्यासक्रम पाहण्यासाठी क्लिक करा

1 thought on “Krushi Sevak Bharati 2023 : राज्यात कृषीसेवक पदाच्या 2109 जागांसाठी भरती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत