जळगाव :- जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांनी मंगळवारी (दि.११) आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे देण्यात आला आहे. तर माहिती अधिकारी शैलजा देशमुख यांची डहाणू येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर शिर्डी येथील उप माहिती कार्यालय येथील माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. सुरेश पाटील यांनी देखील मंगळवारी (दि.११) पदभार स्विकारला.