Central Railway Train Cancelled

Train Cancelled : मध्य रेल्वेकडून तब्बल 24 रेल्वे गाड्या रद्द; काही गाडयांच्या मार्गात बदल

हॅपनिंग

कोणत्या गाड्यांचा आहे समावेश ; वाचा सविस्तर बातमी

भुसावळ :- रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) कडून भुसावळ विभागातील 24 रेल्वे रद्द (Train Cancelled) तर काही गाड्यांच्या मार्गात बदल व सुरु होण्याच्या स्टेशनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर गावी जाण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी वाचणे गरजेचे आहे. कोणत्या गाड्या रद्द व कोणत्या गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे, हे तुम्हाला या बातमीतून समजणार आहे.

मध्य रेल्वेकडून 183.94 कि. मी. लांबीच्या भुसावळ – मनमाड विभागादरम्यान नवीन तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान 71.72 कि. मी. चे बांधकाम पूर्ण झाले आहे. पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान उर्वरित 112.22 कि. मी. चे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ विभागात दि. 14 रोजी सकाळी 11 वाजेपासून 2 दिवस मनमाड स्टेशन यार्डमध्ये इंटरलॉकिंग नसलेल्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक चालवणार आहे. दि. 14 व 15 रोजी असे दोन दिवस 15 तासांचा हा ब्लॉक चालणार आहे.

या आहेत रद्द झालेल्या गाड्या
रद्द झालेल्या डाऊन रेल्वे गाड्यांमध्ये देवलाली-भुसावळ एक्सप्रेस (11113), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस (22223), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस (17617), इगतपुरी-भुसावळ मेमू (11119), सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्सप्रेस (12071) पुणे – जबलपूर एक्सप्रेस (02131), दादर – गोरखपूर एक्सप्रेस (01027), मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (12139), मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस (11401) पुणे – नागपूर एक्सप्रेस (12113), पनवेल – रीवा एक्सप्रेस (01752), पुणे – नागपूर एक्सप्रेस (12135), मुंबई – नांदेड राज्य राणी एक्सप्रेस (17612), मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस (17057), कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (11039), एलटीटी – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (07427), पुणे – भुसावळ एक्सप्रेस (11026) तर अप गाड्यांमध्ये भुसावळ – देवलाली एक्सप्रेस (11114), भुसावळ – इगतपुरी मेमू (11120), हजूर साहिब नांदेड – मुंबई एक्सप्रेस (17618), रीवा – पनवेल एक्सप्रेस (01751), साईनगर शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (22224), गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस (11040), गोरखपूर – दादर एक्सप्रेस (01028), जालना – मुंबई एक्सप्रेस (12072), नागपूर – पुणे एक्सप्रेस (12114), आदिलाबाद – मुंबई एक्सप्रेस (11402), सिकंदराबाद – मुंबई एक्सप्रेस (17058), नागपूर – पुणे एक्सप्रेस (12136), हजूर साहिब नांदेड – मुंबई एक्सप्रेस (17611), नागपूर – मुंबई एक्सप्रेस (12140), हजूर साहिब नांदेड – एलटीटी एक्सप्रेस (07426), जबलपूर – पुणे एक्सप्रेस (02132), भुसावळ – पुणे एक्सप्रेस (11025) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

या गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड
यु. पी. कालका – साईनगर शिर्डी एक्सप्रेस (22456) ही गाडी भुसावळ, यु. पी. सिकंदराबाद – मनमाड एक्सप्रेस (17064) नगरसोल, मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस (12109) नाशिकरोड पर्यंत धावेल तर श्रीनगर शिर्डी – कालका एक्स्प्रेस (22455), मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस (12110) नाशिक रोडपर्यंत तर मनमाड – सिकंदराबाद एक्स्प्रेस नगरसोल येथून धावतील.

या गाड्यांच्या मार्गात बदल
ब्लॉक दरम्यान काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. डाऊन गाड्यांमध्ये पुणे – हावडा एक्स्प्रेस (12221) लोणावळा – वसई – उधना – जळगाव मार्गे, हजूर साहिब नांदेड सचखंड एक्सप्रेस (12715) पूर्णा – अकोला – भुसावळ मार्गे आणि खंडवा मार्गे, पुणे – जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस (11077) लोणावळ – वसई रावड – उधना – जळगाव मार्गे, बेंगळुरू – नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस (12627) गुंटकल – सिकंदराबाद – काझीपेट – बल्हारशाह – नागपूर – जुझारपूर आणि इटारसी मार्गे, यशवंतपूर – अहमदाबाद एक्सप्रेस (22690) पुणे – लोणावळ – कल्याण आणि वसई रावड मार्गे, पुणे – दानापूर एक्स्प्रेस (12149) लोणावळा – वसई राऊड – उधना – जळगाव मार्गे, एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस (22848) वसई रावड – उधना – जळगाव मार्गे, पुणे – हावडा एक्सप्रेस (12129) लोणावळा – पानवे मार्गे, दादर – साईनगर शिर्डी (12131) पुणे – दौंड मार्गे, वास्को – द – गामा – निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (12779) पुणे – लोणावळा – कल्याण – वसई रोड – भेस्तान – चलठाण – पाळधी – जळगावमार्गे, पुणे – बनारस एक्सप्रेस (22131) लोणावळा – वसई रोड – भेस्तान – जळगावमार्गे तर अप गाड्या बनारस – हुबली एक्सप्रेस (17327) खंडवा – भुसावळ – अकोला – पूर्णा – परभणी – लातूर रोड – लातूर, कुर्डुवाडीमार्गे, नवी दिल्ली – बेंगळुरू कर्नाटक एक्सप्रेस (12628) इटारसी – जुझारपूर – नागपूर – बल्हारशाह – काझीपेट – सिकंदराबाद – गुंटकलमार्गे, दानापूर – पुणे (12150) जळगाव – वसई रोड – कल्याण, लोणावळामार्गे, अमृतसर – हजूर साहिब नांदेड सचखंड एक्सप्रेस (12716) भुसावळ कॉर्ड लाईन – अकोला – पूर्णा मार्गे, निजामुद्दीन – म्हैसूर एक्सप्रेस (12782) इटारसी – भुसावळ – जळगाव – वसई रोड – कल्याण – लोणावळा – पुणेमार्गे, जेएसएमइ – पुणे एक्सप्रेस (11428) जळगाव – वसई रोड, लोणावळामार्गे, जम्मू तावी – पुणे झेलम एक्सप्रेस (11078) जळगाव – वसई रोड – लोणावळामार्गे, निजामुद्दीन – वास्को – द – गामा गोवा एक्सप्रेस (12780) ही जळगाव – पाळधी – चलठाण – भेस्तान – वसई रोड – कल्याण – लोणावळा – पुणेमार्गे, हावडा – पुणे एक्सप्रेस (12130) जळगाव – वसई रोड – लोणावळामार्गे वळविण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत